‘शिवाजी कोण होता?’प्रमाणे ‘असा होता टिपू सुलतान’ घराघरात पोहचवायला हवे!
ज्या इंग्रजांविरुद्ध लढण्यात टिपूनं हौतात्म्य पत्करलं, त्या इंग्रजांच्या निगराणीत लिहिलेला चुकीचा इतिहास संदर्भ म्हणून वापरत तथाकथित इतिहासकारांनी टिपूला चुकीच्या पद्धतीनं रंगवण्यात आपल्या लेखण्या कशा झिजवल्या आणि खरा टिपू कोण अन कसा होता, हे भक्कम पुराव्यानिशी मांडण्यात सरफराज यशस्वी झाले आहेत. सरफराज यांच्या लिखाणाचं अजून एक वैशिष्ट्य असं की, त्यांच्या प्रत्येक मांडणीमागे भक्कम पुरावे आणि संदर्भ आहेत.......